पक्ष सोडण्यासाठी होती पैशांची ऑफर-मनसे नगरसेवक संजय तुर्डेंचा खुलासा

पक्ष सोडण्यासाठी होती पैशांची ऑफर-मनसे नगरसेवक संजय तुर्डेंचा खुलासा

तसंच या पैशाच्या ऑफर संदर्भात त्यांनी एसीबीकडे तक्रार देखील केली आहे. या मुंबई महानगरपालिकेत कुठल्यातरी विद्यमान नगरसेवकाने केलेली ही पहिली तक्रार आहे

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर:मनसे सोडून शिवसेनेत सामील होण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती असा धक्कादायक आरोप मनसेचे मुंबईतले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या सहा नगरसेवकांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

आपण मनसे कधीच सोडणार नसल्याचंही तुर्डे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच या पैशाच्या ऑफर संदर्भात त्यांनी एसीबीकडे तक्रार देखील केली आहे. या मुंबई महानगरपालिकेत कुठल्यातरी विद्यमान नगरसेवकाने केलेली ही पहिली तक्रार आहे.भांडूपच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पराभवास सामोरे जावे लागले होते.त्यात भाजपने यश मिळवल्यामुळे शिवसेना आणि भाजप दोघांच्या जागांमधील अंतर कमी झाले होते.तेव्हा आपली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेने मनसेनेचे सहा नगरसेवक फोडले होते. यावरून बरीच राजकीय खळबळही माजली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 12:39 PM IST

ताज्या बातम्या