Home /News /mumbai /

Shocking! पवई तलावात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला

Shocking! पवई तलावात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला

पवई तलावाच्या काठावर बांधलेला रॅम्प तोडल्यास मगरीचा हा हल्ला टाळता आला असता, असा दावा निसर्गप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.

    मुंबई 27 जून : विजय काकवे या 40 वर्षीय आदिवासी व्यक्तीवर मगरीने हल्ला केला. यात सुदैवाने काकवे यांचा जीव वाचला आहे. शनिवारी पवई तलावात मासेमारी करत असताना काकवे यांच्या पायाला मगरीने चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले (Crocodile Attacks on a man at Powai lake). त्यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बंगल्याला आग लागताच पित्याने तिन्ही मुलांना वाचवलं पण स्वतः गमावला जीव; पनवेलमधील हृदयद्रावक घटना पवई तलावाच्या काठावर बांधलेला रॅम्प तोडल्यास मगरीचा हा हल्ला टाळता आला असता, असा दावा निसर्गप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. "वर्षाच्या या काळात मगरी पवई तलावाशेजारी असलेल्या मऊ मातीवर आपली अंडी घालतात. या तलावाच्या पलीकडे Rennaissance हॉटेलच्या बाजूला आधीच अनेक बांधकामे सुरू आहेत. तसंच, अनेक पिकनिकर्सही इथे फिरत असतात. तलावाजवळील पार्ट्याही सुरू असतात. यामुळे सागरी प्रजातींना त्रास होतो. मी स्वतः काकवे यांना राजावाडी रुग्णालयात नेलं आणि डॉक्टरांना त्यांच्या पायाकडे लक्ष देण्याची विनंती केली. या घटनेत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता," असं सेव्ह पवई तलावाचे कार्यकर्ते तबरेज सय्यद यांनी सांगितलं. कृषीमंत्री गुवाहाटीत पाहताय झाडी..डोंगर अन् राज्यात 55 हजारांसाठी शेतकऱ्याने घेतला गळफास याठिकाणी मगरी असून तलावाच्या जवळ न जाण्याचा इशारा पर्यटकांना द्यावा आणि यासाठी बीएमसी तसंच वन अधिकाऱ्यांना तलावाभोवती अधिक चेतावणी देणारे फलक लावावे अशी मागणी केली जात आहे. "इथे बनवण्यात आलेल्या सायकल ट्रॅकलाही नागरिक आणि कार्यकर्ते अशा विरोध करत आहेत. आतापर्यंत केलेलं बांधकाम हटवण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने महापालिकेला नुकतेच दिले होते. मात्र, अद्याप अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. बीएमसी तलावाचे जतन करण्यासाठी ही कारवाई अजूनही करत नाहीये,” सय्यद यांनी म्हटलं..
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crocodile, Mumbai

    पुढील बातम्या