घाटकोपर दुर्घटना; ढिगाऱ्याखालून मुलाला फोन केल्यामुळे वाचले राजेश दोशींचे प्राण

घाटकोपर दुर्घटना; ढिगाऱ्याखालून मुलाला फोन केल्यामुळे वाचले राजेश दोशींचे प्राण

सध्या राजेश दोशी शांतीनिकेतन रूग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : मंगळवारी घाटकोपरमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राजेश दोशींचे प्राण तब्बल 15 तासांच्या बचावकार्यानंतर वाचवू शकलेत. राजेश दोशी हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती त्यांच्या मुलाने प्रशासनाला कळवली होती.

राजेश दोशी हे ढिगाऱ्याखाली अडकले असताना त्यांनी त्यांच्या मुलाला फोन करून आपण जिंवत असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मुलाने प्रशासनाला कळवले आणि अखेर एन.डी.आऱ.एफच्या जवानांनी त्यांना शोधून त्यांचे प्राण वाचवले. सध्या राजेश दोशी शांतीनिकेतन रूग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 16 लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 01:00 PM IST

ताज्या बातम्या