Elec-widget

घृणास्पद! मुंबईत कुत्रीवर बलात्कार करून ओरल सेक्ससाठी भाग पाडलं

घृणास्पद! मुंबईत कुत्रीवर बलात्कार करून ओरल सेक्ससाठी भाग पाडलं

कुत्रीवर बलात्कार करून ओरल सेक्ससाठी भाग पाडल्याप्रकरणी एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर: नवी मुंबईतील खारघरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुत्रीवर बलात्कार करून ओरल सेक्ससाठी भाग पाडल्याप्रकरणी एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. मुनमुन कुमार गुवोधन राम (वय-20) असे नराधमाचे नाव असून तो एक फूड आऊटलेटमध्ये नोकरी करतो.

काय आहे हे प्रकरण?

नराधमाने स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्टला हे घृणास्पद कृत्य केले होते. या प्रकरणी प्राणीमित्र कार्यकर्ते विजय रंगारे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर खारघर पोलिसांनी ही कारवाई केली. एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपने ही घटना विजय रंगारे यांच्या लक्षात आणून दिली. विजय रंगारे हे खारघरच्या सेक्टर 4 मध्ये त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले होते. काही विद्यार्थ्यांनी विजय रंगारे यांना एक व्हिडिओ दाखवला. त्यात आरोपी भटक्या कुत्रीवर बलात्कार करताना दिसत होता. एवढेच नाही तर नंतर आरोपीने कुत्रीला ओरल सेक्स करण्यासाठी भाग पाडले होते. विजय रंगारे यांनी दुसऱ्याच दिवशी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत व्हिडिओच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नराधम आता वासनेची भूक शमवण्यासाठी मुक्या प्राण्यांची शिकार करत आहे.

धक्कादायक.. 7 वर्षांच्या चिमुरडीवर 3 नराधम 8 महिन्यांपासून करत होते गॅंगरेप

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कल्याण शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली होती. 7 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 3 नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही नराधम गेल्या 8 महिन्यांपासून हे कृत्य करत होते. शाळा सुटल्यानंतर नराधम पीडित चिमुरडीला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन नराधन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होते.

Loading...

पीडित चिमुरडी तिच्या चुलत बहीणीसोबत खेळत होती. पीडितेची वर्तवणूक पाहून तिच्या आजीला शंका आली. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. आजीने ही बाब मुलगा आणि सुनेच्या कानावर घातली. मुलीच्या आई-वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तिन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या

शाळा सुटल्यानंतर चिमुरडीला घेऊन जायचे नराधम..

विक्रम पुरोहित (19), नवीन जसुजा (24) आणि अजय दोहारे (34) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसही सून्न झाले. शाळा सुटल्यानंतर मुलीचा ऑटो रिक्षा येण्यास 15 मिनिटांचा कालावधी लागत असे. या दरम्यान तिन्ही आरोपी चिमुरडीला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार करत होते. रिक्षाचालक तिला घेण्यासाठी येण्यापूर्वीच ते परत शाळेबाहेर आणून सोडत असल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. कल्याण बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये पोक्सा कायद्यांतर्गत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चक्क विहीरच गेली वाहून, बारामतीतला VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...