मुंबई, 04 मे : चित्रपटातील कथानकामध्ये घडावी असा खून मुंबईतील ट्राम्बे येथे घडला आहे. सासू, मेव्हणी आणि बायकोनं नवऱ्याचा खून केला. त्यानंतर नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव रचला. पण, पोलिसांच्या सतर्कपणामुळे सारा प्रकार समोर आला आहे.
मुंबईतील ट्राम्बे येथील 35 वर्षीय रिक्षा ड्रायव्हर असलेल्या रहिम खानचं पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं. जास्त दारू पिण्यावरून दोघांमध्ये हा वाद झाला होता. यावेळी वाद झाल्यानंतर रहिमनं पत्नीला मारहण देखील केली. त्यानतंर बायकोनं फोन करून आई आणि मेव्हणीला बोलावून घेतलं. यावेळी तिघींनी देखील दारूच्या नशेत असलेल्या रहिम खानला बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान रहिमचं डोकं भींतीवर आपटलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ‘हिंदुस्थान टाईम्स’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
आपलं पितळ उघड पडणार या भीतीनं त्यांनी रहिम खानला सरकारी रूग्णालयात हलवलं. पण, डॉक्टरांनी रहिम खानला मृत घोषित केलं. गुरूवारी मध्यरात्री 2 वाजून 45 मिनिटांनी हा सारा प्रकार घडला. त्यानंतर पत्नी सलमा, सासू बिल्किश आणि मेव्हणी तजुनीशानं रहिम खानच्या मृत्यूचा बनाव रचला.
बोईंग 737 नदीत कोसळलं; विमानामध्ये होते 136 प्रवाशी
भावाला दिली रहिम अत्यवस्थ असल्याची खबर
त्यानंतर त्यांनी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी रहिमच्या खोपीलीस्थित भावाला रहिम अत्यवस्थ असल्याची माहिती फोनवरून दिली. दरम्यानच्या काळात त्यांनी एका स्थानिक डॉक्टरकडून रहिमच्या मृत्यूचा दाखला देखील मिळवला. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. पण, पोलिसांना या साऱ्याची खबर लागली. पोलिसांनी रहिम खानच्या घरी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर या सर्व बाबी समोर आल्या. रहिमला मारहाण करत असताना रहिम आणि सलमाची 12 वर्षाची मुलगी सर्व काही असहाय्य होऊन पाहत होती. दरम्यान, रहिमच्या पत्नी, सासू आणि मेव्हणीविरोधात भादंवि 302 आणि 323 अंतर्गत खुनाचा गुन्ह दाखल केला गेला आहे.
VIDEO: कोकण रेल्वेचं एका सेकंदात बुकिंग फुल्ल, रांगेतील पहिल्या प्रवाशालाही मिळालं नाही तिकीट