'मुलगा झोपला आहे, मला घरी येऊन अटक करा,' पत्नीचा खून करून पोलीस ठाण्यात केला फोन

'मुलगा झोपला आहे, मला घरी येऊन अटक करा,' पत्नीचा खून करून पोलीस ठाण्यात केला फोन

अंबरनाथमध्ये खुनाचा एक धक्कादायक प्रकार घडला. दीपक भोई नावाच्या एका इसमाने त्याच्या पत्नीची हत्या केली. यानंतर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फोनही केला आणि आपल्या गुन्ह्याची माहिती दिली.

  • Share this:

अंबरनाथ, 11 जुलै : अंबरनाथमध्ये खुनाचा एक धक्कादायक प्रकार घडला. दीपक भोई नावाच्या एका इसमाने त्याच्या पत्नीची हत्या केली. यानंतर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फोनही केला आणि आपल्या गुन्ह्याची माहिती दिली.

या गुन्ह्यानंतर पोलीस त्याला अटक करणार हे तर उघडच होतं. त्यावेळी त्याने पोलिसांना, आपण पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही, असं सांगितलं. माझा दोन वर्षांचा मुलगा झोपला आहे. त्यामुळे मी पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही, असं त्याचं म्हणणं होतं.

2 मुलांची जबाबदारी

या गुन्हेगाराने पोलीस स्टेशनला स्वत:हून फोन केल्याची माहिती पोलिसांनीच दिली. दीपक भोई आणि त्याची पत्नी रुपाली भोई यांच्यात अनेक दिवस भांडण सुरू होतं. त्यांना नऊ वर्षांची एक मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे.

हिटलरची कार होणार इतिहासजमा, काय आहे या कारची खासियत?

दीपक भोईच्या भाच्याचं जळगावमध्ये लग्न होतं. त्यासाठी रुपालीला जळगावला जायचं होतं. पण दीपकने तिला तिथे जायला मनाई केली. त्यानंतर त्यांचं मोठं भांडण झालं. दीपकने रागाच्या भरात बेडरूममध्ये जाऊन ओढणीने तिचा गळा दाबला आणि रुपालीची हत्या केली. त्यावेळी त्यांचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता आणि मुलगी शाळेत गेली होती.

खुनाचा गुन्हा दाखल

हा खुनाचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. दोन्ही लहान मुलांना त्यांच्या काकांकडे पाठवण्यात आलं. दीपक भोई याच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

=================================================================================

VIDEO : धोनीचा फोटो काढताना फोटोग्राफरलाही रडू कोसळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 05:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading