टायगर श्रॉफ आवडतो म्हणून लोकलमध्ये स्टंटबाजी, तरुणाला खावी लागली तुरुंगाची हवा

टायगर श्रॉफ आवडतो म्हणून लोकलमध्ये स्टंटबाजी, तरुणाला खावी लागली तुरुंगाची हवा

बॉलीवूड कलाकारांसारखं वागणं एखाद्याच्या जीवावर बेतणार ठरलं तर? ही घटना आहे मुंबईतील. सीएसएमटीवरुन गोरेगावला जाणारी लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 फेब्रुवारी : बॉलीवूड कलाकारांच्या चाहत्यांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. कुणी सलमान-शाहरुखच्या घरासमोर त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासंतास उभे राहतात. तर कुणी रणवीरसारखे कपडे घालून त्याला फॉलो करतात. दीपिका-करिनाची हेअरस्टाईल कॉपी केली जाते तर कतरिना-आलियाचा मेकअप. पण या बॉलीवूड कलाकारांसारखं वागणं एखाद्याच्या जीवावर बेतणार ठरलं तर? ही घटना आहे मुंबईतील. सीएसएमटीवरुन गोरेगावला जाणारी लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. किंग सर्कल स्थानकातून दीपक चव्हाण या स्टंटबाज तरुणाला अटक करण्यात आली आहे.

या तरुणाची कहाणी ऐकली तर हसावं की रडावं हेच तुम्हाला कळणार नाही. 8 फेब्रुवारीला ही घटना घडली. किंग सर्कल स्थानकात जीवघेणार स्टंट करणाऱ्या या तरुणाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. दीपक टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) चाहता आहे. टायगर ज्याप्रमाणे सिनेंमांमध्ये स्टंट करतो त्याचप्रकारे खऱ्या आयुष्यात स्टंट करण्याचा दीपकचा मानस होता. पण या स्टंटबाजीमुळे त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं आहे. एखाद्याचं फॅन असणं वाईट नाही, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगलटच येतो. असंच काहीसं या तरुणाच्या बाबतीत घडलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे दीपक चव्हाणला फक्त स्टंटबाजीमुळे नाही तर याआधीही अनेक वेळा तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्याला रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार सुद्धा केलं आहे. तरीही कायद्याचं उल्लंघन करत हा तरुण मोकाट वावरत होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2020 08:46 PM IST

ताज्या बातम्या