तुर्भे स्टेशनवरील विनयभंगाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद; आरोपी गजाआड

तुर्भे स्टेशनवरील विनयभंगाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद; आरोपी गजाआड

नेहमी सामसुम असणाऱ्या नवी मुंबईमधील तुर्भे स्टेशनवरील एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलं आहे. या व्हिडीओ एक तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 23 फेब्रुवारी : नेहमी सामसुम असणाऱ्या नवी मुंबईमधील तुर्भे स्टेशनवरील एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलं आहे. या व्हिडीओ एक तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही तरुणी तुर्भे रेल्वे स्थानकावरून जात असताना मागून एक माणसाने तीला पकडण्याचा प्रयत्न केला. आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. आरोपी नरेश जोशी असं या नराधमाचं नाव आहे.

नवी मुंबई पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर्भा रेल्वे स्थानकात प्रवाशांची वरदळ नेहमी कमी असते. त्यामुळे रेल्वे परिसरात पोलीस सुरक्षा त्या मानाने कमी असते. त्यातच असे नराधम डाव साधून जातात.

रेल्वे स्थानकावर गर्दी नसल्याने इथल्या निम्म्या जिन्यांवर लव्हर्स स्पॉट झाला आहे. त्यामुळे या स्थानकाची सुरक्षा रामभरोसे आहे असंच म्हणाव लागणार आहे.

First published: February 23, 2018, 11:14 AM IST

ताज्या बातम्या