Home /News /mumbai /

बंगल्याला आग लागताच पित्याने तिन्ही मुलांना वाचवलं पण स्वतः गमावला जीव; पनवेलमधील हृदयद्रावक घटना

बंगल्याला आग लागताच पित्याने तिन्ही मुलांना वाचवलं पण स्वतः गमावला जीव; पनवेलमधील हृदयद्रावक घटना

आपल्या राहत्या बंगल्यात आग लागल्यानंतर एका पित्याने आपल्या तिन्ही मुलांना यातून सुखरूप बाहेर काढलं. मात्र, यात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला (Man Died in a Fire Break out at Bungalow).

    नवी मुंबई 27 जून : आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी आई-वडील काहीही करू शकतात, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. बऱ्याचदा याचा प्रत्यय देणाऱ्या घटनाही आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. सध्या अशीच एक घटना पनवेलमधून समोर आली आहे. यात आपल्या राहत्या बंगल्यात आग लागल्यानंतर एका पित्याने आपल्या तिन्ही मुलांना यातून सुखरूप बाहेर काढलं. मात्र, यात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला (Man Died in a Fire Break out at Bungalow). Nagpur Crime : नागपूर हादरलं, जावायानं मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या राजीव ठाकूर (वय ३८) असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्ती अभिनेता होता, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. गावात असलेल्या ग्राऊंड प्लस वन घराला ही आग लागली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात खांदेश्वर पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही आग इतकी भीषण होती, की विझवण्यासाछी अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले. अखेर २ तासांनी ही आग विझवण्यात यश आलं. तीन फायर इंजिन आणि एक पाण्याचा टँकर आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. घरात आग लागली तेव्हा आतमध्ये राजीव ठाकूर आणि त्यांची तीन मुलं होती. राजीव यांची पत्नी बाहेर गेलेली होती. घरात आग लागल्याचं लक्षात येताच राजीव यांनी प्रसंगावधान दाखवत लगेचच आपल्या तिन्ही मुलांना घरातून सुखरूप बाहेर काढलं. कृषीमंत्री गुवाहाटीत पाहताय झाडी..डोंगर अन् राज्यात 55 हजारांसाठी शेतकऱ्याने घेतला गळफास मुलांना घरातून बाहेर काढल्यानंतर राजीव पहिल्या मजल्यावरील बेडमध्ये राहिलेल्या लॅपटॉप, स्क्रिप्ट्स, कागदपत्रं आणि काही वस्तू गोळा करण्यासाठी गेले. मात्र यादरम्यान ते आगीत अडकले. आगीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Fire

    पुढील बातम्या