इंटरव्ह्यूला बोलावून MBA तरुणीवर हॉटेलमध्ये केला बलात्कार

तरुणी हॉटेलच्या रुममध्ये पोहोचताच आरोपीने दरवाजा आतून लॉक केला.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 07:33 PM IST

इंटरव्ह्यूला बोलावून MBA तरुणीवर हॉटेलमध्ये केला बलात्कार

मुंबई,23 सप्टेंबर:नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बोलावून एका 28 वर्षीय एमबीए झालेल्या तरुणीवर मुंबईतील जुहू येथील हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी दिल्लीतल्या एका नराधमाला अटक केली आहे. साहिलसिंग अरोरा असे आरोपीचे नाव आहे.

बँकेत नोकरी देण्याचे दाखवले आमिष..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीने पीडित तरुणीला एका खासगी बँकेत एचआर पोस्टवर नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपीने पीडितेला जुलैमध्ये नोकरीसाठी फोन केला होता. एका खासगी बँकेत एचआरची नोकरी उपलब्ध असल्याचे सांगत त्याने पीडितेला आपला दुसरा मोबाइल नंबर दिला होता. आपण या खासगी बँकेत टॉप मॅनेजमेंट टीममध्ये असल्याचेही त्याने तिला सांगितले. महिन्याला 30 हजार रुपये सॅलरी मिळेल, असेही त्याने तरुणीला सांगितले होते.

तरुणी रुममध्ये येताच दरवाजा केला लॉक...

अरोराने तरुणीला 19 सप्टेंबरला फोन करून सर्व कागदपत्रांसह इंटरव्ह्यूसाठी जुहूमधील एका हॉटेलात बोलावले होते. तरुणी हॉटेलच्या रुममध्ये पोहोचताच आरोपीने दरवाजा आतून लॉक केला. नंतर तिच्यावर बलात्कार केला. याला विरोध करत तरुणीने आरडाओरड केली. परंतु याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी आरोपीने तिला दिली आणि

Loading...

थेट दुसऱ्या दिवशी तरुणीची सुटका केली.

अश्लील व्हिडिओ वडिलांना पाठवेल..

पोलिसांत तक्रार केल्यास अश्लील व्हिडिओ तुझ्या वडिलांना पाठवू, अशी धमकीही आरोपीने तिला दिली होती. परंतु, नराधमाच्या धमकीला भिक न घालता तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, पीडित तरुणी उत्तर प्रदेशातील असून ती सध्या नवी मुंबईत राहते.

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...