नेत्याच्या गाडीत Drugs ठेवण्याचा रचला कट, मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नेत्याच्या गाडीत Drugs ठेवण्याचा रचला कट, मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आपल्या भावाला एका नेत्याची जागा घेता यावी याकरता एका तरुणाने या संबंधित नेत्याच्या गाडीमध्ये अंमली पदार्थ (Drugs) ठेवून फसवण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी: राजकारण म्हटलं की काही वेळा चुकीच्या कार्यपद्धतींचा वापर केलेला पाहायला मिळतो. आपल्या भावाला एका नेत्याची जागा घेता यावी याकरता एका तरुणाने या संबंधित नेत्याच्या गाडीमध्ये अंमली पदार्थ (Drugs) ठेवून फसवण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थविरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला असून या व्यक्तीस अटक करण्यात त्यांना यश आलं आहे. दक्षिण मुंबईत (South Mumbai) हा प्रकार घडला.

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने ही कारवाई केली आहे. शुक्रवारी याप्रकरणी अब्दुल अझीझ उर्फ अझ्झूला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी दोघांकडून Mephedrone जप्त करण्यात आले होते, त्यांनी अझ्झूचे नाव घेतले होते, अशी माहिती मीडिया अहवालात देण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

(हे वाचा-मुंबईत धूम स्टाईल रेसिंग करणाऱ्यांचा उच्छाद, पोलीस करणार मोठी कारवाई)

या प्रकरणात (Drug Case) आता मुंबई पोलिसांनी एकूण 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर भादवी कलम 120 बी आणि एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोप असणारे असीफ सरदार आणि अझ्झू हे अंमली पदार्थ सेवनाविरोधात काम करणाऱ्या एका एनजीओसाठी काम करतात. याप्रकरणी ज्यांची नाव समोर आली आहेत, त्यांच्याकडून अधिक तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. त्यांची कसून चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

(हे वाचा-लाडक्या जावयाचे लाड झाले फार, सासूने काढली थेट पोलीस स्टेशनमध्ये वरात!)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अझ्झूने असे म्हटले होते की काही बिल्डर्स आणि उद्योजक या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होते आणि त्यामुळे त्यांना त्याचे अस्तित्व संपवायचे होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 17, 2021, 12:43 PM IST

ताज्या बातम्या