मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोनाची लाट आटोक्यात आल्यामुळे बाजारपेठा आणि लोकल सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. आता त्यापाठोपाठ मॉल्स उघडण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. उद्यापासून मॉल्स (mall) उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड लशीचे 2 डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. मॉल आणि हॉटेल (hotel) 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा झाली. मुंबई आणि पुण्यात हॉटेल आणि रेस्टॅारंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आता हा निर्णय राज्यात लागू करावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची वेळ 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, खरेदी करण्याआधी इथे तपासा प्रति तोळा सोन्याचा भाव
तसंच, मॉल्स 50 टक्के आसन क्षमतेनं सुरू करण्यात यावे, अशी चर्चा सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. बहुतेक मंत्र्यांनी याबाबत मॉल्स, हॉटेल्स सुरू करावे असं मत मांडले. त्यानंतर ज्या व्यक्ती कोरोना लशीचे दोन डोस घेतले आहे, त्यांना प्रवेश दिला जाईल.
परंतु, थिएटर, सिनेमागृह, नाट्यगृह, मंदिरं बंद राहणार आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
• नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत
• भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करणार
• अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघु पाटबंधारे प्रकल्पास १९३.८१ कोटींची सुधारीत मान्यता.
• अनाथांना एक टक्का आरक्षण लागू करणार.
• नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारीत योजना राज्यात राबविणार.
दरम्यान, मुंबईतील निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात आले आहेत. रेस्टाँरंट, मॉल आणि दुकानं यांची वेळ वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स (Task Force)आणि रेस्टाँरंट (restaurants) मालक संघटनांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आज कॅबिनेटमध्ये या संदर्भात आणखी चर्चा होणार आहे. पुढील 1 किंवा 2 दिवसात SOP जाहीर होईल, असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.
चाळीशीतच तिसरं Transplant, शरीरात बसवली पाचवी किडनी
पुढे अस्लम शेख म्हणाले की, लॉकडाऊन टप्या टप्याने शिथिल करणं योग्य ठरेल. जी परिस्थिती आता केरळमध्ये आली आहे. ती आपल्याडे येऊ नये यासाठी आपल्याला जपून पाऊल उचलावं लागेल.
परत कोरोना वाढता कामा नये, असंही ते म्हणालेत. त्यामुळे मॉल आणि रेस्टाँरंट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दोन लस पूर्ण केल्यास त्यांनाही काम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेऊ, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.