मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी, मृतांमध्ये 10 वर्षाखालील 6 लहान मुलांचा समावेश

मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी, मृतांमध्ये 10 वर्षाखालील 6 लहान मुलांचा समावेश

Malad Malvani building collapsed:  मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची संपूर्ण यादी.

Malad Malvani building collapsed: मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची संपूर्ण यादी.

Malad Malvani building collapsed: मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची संपूर्ण यादी.

मुंबई, 10 जून: मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर Heavy rain in Mumbai) मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Malad Building Collapsed)

न्यू कलेक्टर (New Collector compound) कंपाऊंटमधील चार इमारतीचा काही भाग कोसळला. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुर्देवानं मृतांमध्ये 6 लहांना मुलांचा समावेश असून या लहानग्यांचं वय 10 वर्षाच्या आत आहे.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी

1. साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष

2. अरिफा शेख- 8 वर्ष

3. अज्ञात (पु) – 40 वर्षे

4. अज्ञात (पु)- 15 वर्षे

5. अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे

6. अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे

7. अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे

8. अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे

9. अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे

10. अज्ञात (पु) – 8 वर्षे

11. जॉन इराना- 13 वर्ष

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी

मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष 30

धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष 56 (प्रकृती स्थिर)

लीम शेख- वय वर्षे 49 (प्रकृती स्थिर )

रिजवाना सय्यद- वय वर्ष 33(प्रकृती स्थिर)

सूर्य मनी यादव- वय वर्षे 39 (प्रकृती स्थिर)

करीम खान वय वर्ष- 30 (प्रकृती स्थिर)

गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष 26 (प्रकृती स्थिर)

हेही वाचा-  मालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai