मुंबई 13 फेब्रुवारी : महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत बोलघेवड्या नेत्यांवर चर्चा करण्यात आलीय. गुरुवारी रात्री वर्षावर ही बैठक झाली. या बैठकीत नेते आणि मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे होणाऱ्या वादांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवावा अशा कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना फटकारले. या बैठकीला महत्त्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित होते. विनाकारण सार्वजनिक वादग्रस्त विधाने टाळा. ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाहीत अशी वक्तव्य करू नका अशा कडक सूचना पक्षातील नेत्यांना या बैठकीत करण्यात आल्या.
जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, संजय निरूपम, संजय राऊत या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या विधानांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी ठरली आहे, नेमका हाच सूर धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांत चर्चा झाली.
धक्कादायक! पेस्ट कंट्रोलनंतर केलं दुर्लक्ष, पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यूयशवंतराव गडाखांचा तो इशारा
शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडीचं सरकार येऊन आता काही महिने होताहेत मात्र अजून त्यांच्यातली भांडणं पूर्णपणे मिटलेली नाहीत. वेगवेगळ्या कारणांवरून कुरबुरी सुरूच असल्याचं बाहेर येतंय. यावरूनच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलंच सुनावलंय. आत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडणं थांबवावीत. तुम्हाला सत्ता ही भांडण्यासाठी दिलेली नाही असं त्यांनी सुनावलं. बंगले, ऑफिस, मंत्रिपदं यावरून सध्या सरकारमध्ये भांडणं असल्याचं पुढे आलं होतं. त्यावरून त्यांनी एका कार्यक्रमात हा सल्ला देत एक गंभीर इशाराही दिलाय.
गडाख म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय. खरं तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला नसता तर यांना फक्त तोंडाची हवा काढत बसावं लागलं असतं असंही ते म्हणाले.
गडाख पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे हे काही राजकारणी नाहीत. मी त्यांना लहान असल्यापासून ओळखतो. ते कलाकार आहेत. ही भांडणं अशीच राहिलीत तर ते कधीही राजीनामा देऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळीच सावध व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.