मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मविआ सरकारमध्ये निधी वाटपात मोठी असमानता; राष्ट्रवादीचं वर्चस्व, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेलाच सर्वात कमी निधी

मविआ सरकारमध्ये निधी वाटपात मोठी असमानता; राष्ट्रवादीचं वर्चस्व, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेलाच सर्वात कमी निधी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Major inequality in allocation of funds in Maharashtra: महाराष्ट्रात निधी वाटपात मोटी असमानता दिसून आली आहे. मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला सर्वात कमी निधी वाटप झालं आहे.

मुंबई, 17 डिसेंबर : शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांची सत्ता महाराष्ट्रात आहे. मात्र, या तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यातच आता निधी वाटपातही मोठी असमानता झाली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात निधी वाटपात सर्वात कमी निधी हा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांना मिळाला आहे.

राज्य सरकारमध्ये असलेला क्रंमाक एकचा पक्ष शिवसेना निधी मिळवण्यात मात्र सर्वात पिछाडीवर आहे. बजेटमधून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त निधी मिळवणारा पक्ष ठरलाय तो राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर काँग्रेस आणि सर्वात शेवटी म्हणजे शिवसेना. इतकेच नाही तर याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांचेच सुपुत्र हे मंत्री असताना सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही निधीबाबतीत फटका बसला आहे.

कुठल्या पक्षाला किती निधी ?

शिवसेना -  56 आमदार

निधी - 52255 कोटी

काँग्रेस - 43 आमदार

निधी - 100024 कोटी

राष्ट्रवादी काँग्रेस - 53 आमदार

निधी - 224411 कोटी

वाचा : मनसेला आणखी एक धक्का? मनसेच्या नेत्याने घेतली शिवसेना नेत्याची गुप्त भेट

मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला सर्वात कमी निधी

2020-21 या वर्षात तिन्ही पक्षाला मिळालेल्या निधीची ही आकडेवारी आहे. ज्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे. ज्या शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी आहे.

निधी वाटपात राष्ट्रवादी अव्वल

विशेष म्हणजे आकड्यांच्या खेळात नंबर दोन वर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी मिळवण्यात मात्र सर्वात अव्वल ठरली आहे. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळाला आहे.

तर निधी पदरात पाडून घेण्यात काँग्रेसनही शिवसेनेला मागे टाकलं आहे. त्यामुळे वर्षानूवर्ष सत्तेत राहिल्याचा अनुभव राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडला आहे असे दिसून येते.

गेल्यावर्षी अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्यानंतर ज्या-ज्या विभागाला निधी वाटप झाला आहे त्याची ही आकडेवारी आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वाधिक निधी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाल्याचं दिसत आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचेच या सरकारमध्ये सर्वाधिक आमदार असतानाही त्यांना सर्वात कमी निधी वाटप झालं आहे. शिवसेनेपेक्षा काँग्रेसलाही अधिक निधीवाटप झाल्याचं उघड झालं आहे.

आम्ही आहोत म्हणून राज्यात सत्ता - अशोक चव्हाण

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जालनात काल एक मोठं वक्तव्य केलं. आम्ही आहोत म्हणून राज्यात सत्ता आहे असं सांगत अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर देत राष्ट्रवादीसह शिवसेनेला डिवचलं. जालना जिल्ह्यातल्या मंठा नगरपंचात निवडणुकीच्या प्रचार सभेच ते बोलत होते.

First published:

Tags: NCP, Shiv sena, काँग्रेस, महाराष्ट्र