कुर्ला पालिकेच्या कार्यालयाजवळील इमारतीची आग आटोक्यात

कुर्ला पालिकेच्या कार्यालयाजवळील इमारतीची आग आटोक्यात

कुर्ला(पश्चिम)मधील एसजी बर्वे मार्गावरील एका इमारतीला भीषण आग लागली आहे.

  • Share this:

मुंबई,24 जानेवारी: कुर्ला(पश्चिम)मधील एसजी बर्वे मार्गावरील  इमारतीला शुक्रवारी रात्री आग लागली होती.  अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कुर्ला परिसरातील एस.जी.बर्वे मार्गावरील   मेहता बिल्डिंगला आग लागली होती. आग लागल्यानंर आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. दूरपर्यंत दुराचे लोट दिसत होते. तसंच इमारतीमधून स्फोटाचे आवाज ही येत होते. गॅस सिलिंडरचे हे स्फोट  असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या पोहोचल्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

First Published: Jan 24, 2020 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading