भिवंडीत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

भिवंडीत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांची, मोठी वित्तीय हानी झाली आहे. आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.

  • Share this:

भिवंडी, 28 जानेवारी : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत भीषण आग (Fire broke out) लागली आहे. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाला आहे. ही कंपनी ग्राउंड प्लस दोन मजल्याची आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कंपनीला लागलेल्या आगीत, संपूर्ण बिल्डिंगमध्ये आग पसरल्याचं दिसते आहे. आगीचे लोळ सर्वत्र पसरले असून मोठा भडका उडाल्याचं दिसतं आहे.

आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांची, मोठी वित्तीय हानी झाली आहे. आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. आग मोठी असून ठाणे, कल्याण डोंबिवली येथील अग्निशमक दलाला बोलावण्यात आलं आहे.

अंबरनाथ, उल्हासनगर महापालिकेच्या तीन अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: January 28, 2021, 6:21 AM IST

ताज्या बातम्या