Home /News /mumbai /

Mumbai Fire: भायखळा परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग; घटनास्थळावरील LIVE VIDEO

Mumbai Fire: भायखळा परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग; घटनास्थळावरील LIVE VIDEO

ही आग लाकडाच्या गोदामात लागल्याने काहीच वेळात आगीने भीषण रूप धारण केलं. अग्निशमन दल सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.

मुंबई 10 जानेवारी : आज पहाटे मुंबईतील भायखळा परिसरातील माझगाव (Mazgaon Byculla Fire) येथे एका लाकडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली (Major Fire Breaks out In Wooden Shop). काही वेळातच आगीने रूद्ररुप धारण केलं. यानंतर सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. सध्या अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. न्यूयॉर्कमधील रहिवासी इमारतीला लागली भीषण आग; 19 जणांचा होरपळून मृत्यू ही आग लाकडाच्या गोदामात लागल्याने काहीच वेळात आगीने भीषण रूप धारण केलं. अग्निशमन दल सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून कोणी जखमी झाल्याची माहितीही समोर आलेली नाही. ही आग नेमकी कशी किंवा कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. याचा तपास केला जाईल. मुंबईच्या समुद्रात बोटीतून पडली महिला, पोलिसांनी वाचावला जीव, LIVE VIDEO दरम्यान पहाटे लागलेल्या या आगीचे व्हिडिओही हाती आले आहेत. घटनास्थळावरील व्हिडिओ पाहूनच ही आग किती भीषण होती, याचा अंदाज येतो.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Fire, Mumbai News

पुढील बातम्या