मुंबईत रुग्णालयाला आग: आम्ही आगीत अडकलो आहोत, प्लीज वाचवा; रुग्णांचे नातेवाईकांना फोन

मुंबईत रुग्णालयाला आग: आम्ही आगीत अडकलो आहोत, प्लीज वाचवा; रुग्णांचे नातेवाईकांना फोन

एकतर रुग्णालयात आग लागली त्यात अनेक रुग्ण आतमध्ये अडकले असल्यामुळे मोठं भीतीचं वातावरण आहे. आगीची भीषणता वाढली असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत.

  • Share this:

अमन सय्यद, उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई, 17 डिसेंबर : मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि वॉटर टँक घटनास्थळी दाखल झाले आहेत. एकतर रुग्णालयात आग लागली त्यात अनेक रुग्ण आतमध्ये अडकले असल्यामुळे मोठं भीतीचं वातावरण आहे.

आगीची भीषणता वाढली असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एकमेकांना वाचवण्यासाठी फोन करत आहे. आपण कुठे अडकून पडलो असल्याची माहिती ते देत आहेत.  तर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रुग्ण दिसेल त्या मार्गाने बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत.

रुग्णालयात धुराचे लोळ पसरल्यामुळे रुग्णांना गुदमरण्याचा त्रास होतोय. त्यात, आतमध्ये रुग्ण अडकले असल्यामुळे प्रेशरने पाणी मारता येत नसल्यानं अग्निशमन दलाला मोठ्या अडचणी होत आहेत. शॉकसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.

आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही रुग्ण आतमध्ये अडकल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. तर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान, रुग्णालयाच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक जण वरच्या मजल्यावर अडकले आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सध्या सुरू आहे.

VIDEO: मला चुकीच्या पद्धतीने हात लावला म्हणून मी कानाखाली पेटवली - झरीन खान

First published: December 17, 2018, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading