Home /News /mumbai /

मोदी केमिकलला भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानांचा गुदमरून मृत्यू

मोदी केमिकलला भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानांचा गुदमरून मृत्यू

मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे

नवी मुंबई, 5 नोव्हेंबर: पनवेलमधील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मोदी केमिकल या कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आणखी काही जवानाना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे. औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे 39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, कारखाना परिसरात पसरलेल्या केमिकलमुळे एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाला. हेही वाचा...यशोमती ठाकूर यांचा थेट इशारा, सरकार स्थिर चालवायचं असेल तर.... मोदी केमिकलमध्ये आग विझवताना मृत झालेला अग्निशमन दलाचा जवान अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकात कार्यरत होती, अशी माहिती मिळाली आहे. तसोच जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांत गुदमरून हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर इतर जवानांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, साताऱ्यात जिल्ह्यात एका साखर कारखान्यात बॉयलर फुटून स्फोट झाला आहे. त्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी आहेत. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जंरडेश्वर साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की, यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. संभाजी घोरपडे असं मृत कामगाराचं नाव आहे. जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. हेही वाचा...रक्ताचा मोठा काळाबाजार! 500 रुपयांना मिळणाऱ्या बॅगसाठी मोजावे लागतात 2000 जरंडेश्वर साखर कारखान्यात रात्री 10 वाजेच्या सुमारात बॉयलर फुटून भीषण स्फोट झाला. स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या सहा कामगारांवर कोरेगाव येथील खासगी रुग्णायालय उपचार सुरु आहेत. या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील चार किमीचा परिसर हादरुन गेला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Mumbai

पुढील बातम्या