छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते तर अवतारी पुरुष होते. त्यांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य मला मिळाले हा माझ्या पुण्याचा भाग आहे असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी येथे केले. शिवजन्मस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल रविवारी सकाळी 11 वाजता किल्ले शिवनेरीवर पोहचले.गडाच्या पहिल्या पायरीपासून ते जन्मस्थळापर्यंत ते न थकता न दमता चालत गेले. "शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे, चिखल आहे असं सांगून घाबरवत होते पण केवळ महाराजांविषयी श्रद्धेचे स्थान माझ्या मनात असल्याने मी येथे येऊ शकलो"असेही कोश्यारी यांनी माध्यमांंशी बोलताना सांगितले.राज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेट ची एक बैठक रायगड वर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 16, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.