मुंबईच्या मायलेकांकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'बँण्डी' गिफ्ट

मुंबईच्या मायलेकांकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'बँण्डी' गिफ्ट

रक्षिता आणि त्यांचा मुलगा शरयू यांनी त्यांच्याकडील 3 जर्मन शेफर्डची पिल्ले मुंबई पोलिसांना दिली आहेत. आपल्या घरातील श्वानांना देशासाठी काम करताना पाहिल्यामुळे रक्षिता यांनी अभिमान व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : अनेकांना श्वानाच्या वेगवेगळ्या जाती पाळण्याची आवड असते. पण आपण पाळलेले श्वान जर पोलीस दलात मदतीसाठी गेले तर. त्याचा आनंद काही औरच असतो. असाच आनंद माहिमला राहणाऱ्या रक्षिता मेहता यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे. रक्षिता आणि त्यांचा मुलगा शरयू यांनी त्यांच्याकडील 3 जर्मन शेफर्डची पिल्ले मुंबई पोलिसांना दिली आहेत. आपल्या घरातील श्वानांना देशासाठी काम करताना पाहिल्यामुळे रक्षिता यांनी अभिमान व्यक्त केला आहे.

शिराज, नॉयर, वोडका अशी या तीन श्वानांची नावं आहेत. व्हिस्की ही पुरुष जातीचे श्वान असतात तर बँण्डी हे महिला जातीचे श्वान असतात. या जातीच्या श्वानांचा वापर हा अमली पदार्थ विरोध पथकाला गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी होतो. त्यामुळे रक्षिता यांनी दिलेल्या श्वानांची पोलिसांना मदत होणार असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! नोकरी जाण्याच्या नैराश्यात भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या

रक्षिता या माहिमला राहणाऱ्या व्यावसायिक आहे. त्यांच्याकडे 15 जर्मन शेफर्ड प्रजातीचे श्वान आहेत. त्यांच्या ब्रॅण्डीने नुकतंच  5 पिल्लांना जन्म दिला आहे. त्यातल्या 3 पिल्लांना रक्षिता यांनी मुंबई पोलिसांकडे दिलं आहे. त्यामुळे मला एखाद्या जवानाची आई असल्याची भावना रक्षिता यांनी व्यक्त केली आहे. या 3 पिल्लांना मुंबई पोलिसांकडे देताना मला अभिमान वाटत असल्याचंही त्या म्हणाल्या.

एका नातेवाईकांनी त्यांना सुचवले की, श्वानांमधील जर्मन शेफर्ड्स ही प्रजात उत्कृष्ठ स्निफर श्वान म्हणून ओळखली जाते. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ते पोलिसांची सगळ्यात जास्त मदत करतात. त्यामुळे रक्षिता यांनी दिलेल्या श्वानांचा मुंबई पोलिसांना मोठा फायदा होणार आहे. खरंतर या जर्मन शेफर्डची ही पिल्लं घेण्यासाठी अनेकांनी रक्षिता यांना विचारलं होतं. पण त्यांनी पिल्लं देण्यासाठी सगळ्यांना नकार दिला. आणि त्यानंतर रक्षिता आणि त्यांच्या मुलाने ही पिल्ल पोलीस दलाला देण्याचं ठरवलं.

इतर बातम्या - एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात, 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू

यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि आपल्या 3 पिल्लांना देशसेवेसाठी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं. जर्मन शेफर्ड हे मादक पदार्थ आणि आरडीएक्स शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच ते आमच्या वापरासाठी योग्य आहेत. हे कुत्री मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागासाठी वापरता येतील अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 02:53 PM IST

ताज्या बातम्या