ऐन उन्हाळ्यात जनतेला शॉक, 1 एप्रिलपासून वाढणार विजेचे दर

राज्यातील सर्वसामान्य जनतेला ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 09:16 AM IST

ऐन उन्हाळ्यात जनतेला शॉक, 1 एप्रिलपासून वाढणार विजेचे दर

मुंबई, 27 मार्च: राज्यातील सर्वसामान्य जनतेला ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात 6 टक्के वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर महिन्यात हा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे.

राज्य वीज आयोगाने गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी आणि टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. येत्या चार दिवसात महावितरणची दरवाढ लागू होईल आणि विजबिलात 6 टक्क्यांनी वाढ होईल. आयोगाने महावितरणला 8 हजार 268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी दिली होती. आयोगाच्या या निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे.

किती दर वाढणार

सध्या महावितरण घरगुती ग्राहकांकडून दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांकडून 5.30 रुपये प्रति युनिट इतका दर आकारते. त्यात आता 16 पैशांची भर पडणार आहे. तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिटमागे 24 पैसे जास्त मोजावे लागतील. 500 युनिटपर्यंत वीज वापर असल्यास ग्राहकांना वीज 15 पैसे महाग होणार आहे. याशिवाय वीजदरांसोबतच स्थिर आकारातही 10 रुपयांची वाढ केली जाणार आहे. हा तर 80 रुपयांवरुन 90 रुपये होणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा शॉक

Loading...

दरम्यान, महावितरणची 12 हजार 382 कोटी रुपयांची दरवाढ लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही दरवाढ विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लागू केली जाण्याची शक्यता आहे.


VIDEO: 'मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते'बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...