मुंबई, 12 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके सोसणाऱ्या जनतेला आता वीज दरवाढीचाही शॉक बसणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य वीज नियामक आयोगानं वीज दरवाढ केलीये. यामुळे शहरांपासून गावांपर्यंत प्रत्येक भागाला झळ बसणार आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी वापरली जाणारी, घरगुती आणि उद्योगाची वीज यामुळे महागलीये.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन 2018 -2020 या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी आणि औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर 1 सप्टेंबर 2018 पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सन 2018-19 साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर 6 ते 8 टक्क्यांनी कमी करण्यात आले. तर उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरच्या वीजेच्या दरात 0 ते 1 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलीये.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर 3 रुपये 35 पैशांवरून 3 रुपये 55 पैसे प्रती युनिट असे करण्यात आले. तर घरगुती वीज ग्राहकांचे 0 ते 100 युनिटसाठी 5 रु. 07 पैशावरून 5 रु. 31 पैसे तर 101 ते 300 युनिटसाठी 8.74 रु. वरून 8.95 रुपये प्रती युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे.
तर शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या विजेचा दर सध्या ३.३५ रुपये प्रती युनिट होता. तो आता ३.५५ रुपये करण्यात आला आहे. घरगुती वापरासाठीच्या विजेचे दरही वाढवण्यात आल्याची माहिती एमईआरसीचे प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी दिली.
वीज दरवाढीचा शॉक
दक्षिण मुंबई- 6 ते 8 टक्के वाढ
उत्तर मुंबई- 1 टक्के
कृषी वीज -3.35 वरुन 3.55 टक्के
घरगुती वीज-
100 युनिटपर्यंत - प्रती युनिट 5.31 रु.वाढ
101 ते 300 युनिटपर्यंत- प्रती युनिट 8.95 रु वाढ
====================================================================
VIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा