मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात महाविकासआघाडी, पण मुंबईतच होतेय बिघाडी?

राज्यात महाविकासआघाडी, पण मुंबईतच होतेय बिघाडी?

राज्यातलं महाआघाडीचं समीकरण मुंबई महापालिकेत मात्र जुळताना दिसत नाही.

राज्यातलं महाआघाडीचं समीकरण मुंबई महापालिकेत मात्र जुळताना दिसत नाही.

राज्यातलं महाआघाडीचं समीकरण मुंबई महापालिकेत मात्र जुळताना दिसत नाही.

मुंबई, 10 जानेवारी : राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही हे समीकरण तयार होईल, अशी शक्यता होती. मात्र, आघाडी होण्याआधीच बिघाडी होताना दिसत आहे. अभियंत्यांच्या भरती प्रस्तावावरून काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या विरोधात सभात्याग केला. राज्यातलं महाआघाडीचं समीकरण मुंबई महापालिकेत मात्र जुळताना दिसत नाही. भरती प्रस्तावावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या विरोधात सभात्याग केला. महापालिकेमध्ये ऑक्टोबर महिन्यात 341 अभियंता, उपअभियंतांच्या भरतीचा प्रस्ताव आला. मात्र, आचारसंहितेच्या कालावधीत परीक्षा होत असल्यानं सर्वपक्षीय नगरसेवकांनी भरती पुढे ढकलावी, अशी मागणी केली. त्यासाठी दोन वेळा हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला. मात्र, पालिका प्रशासनानं केवळ दिलगिरी व्यक्त करून प्रस्ताव परत पाठवला. याच मुद्द्यावर स्थायी समिती अध्यक्षांनी बोलू दिले नाही, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. स्थायी समिती अध्यक्षांनी हीच पद्धत सुरू ठेवली तर नेहमीच सभात्यागाची भूमिका घेऊ असं विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचे गैरसमज दूर करू असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केलाय. राज्यात सुसाट सुटलेल्या महाविकास आघाडीला मुंबई महापालिकेत सध्या तरी ब्रेक लागण्याची चिन्हं दिसत आहेत. पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये नाराजी दरम्यान, ठाकरे सरकारला वादाचं ग्रहण लागलंय. सतत कोणता ना कोणता वाद सुरू असतो. मंत्र्यांच्या खातेवाटपा पाठोपाठ पालकमंत्री पदावरुन नाराजी नाट्य रंगलंय. महाविकास आधारित संपते न संपते तोपर्यंत पालक मंत्रिपदावरून नाराजी नाट्य सुरू झाले. कोल्हापूर आणि नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यात नाराजी सुरू झाली. महाविकास आघाडीतील मंत्रीपदाचा वादा कायम असतानाचं आता पालकमंत्री पदावरुन नाराजी नाट्य रंगलंय.कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन हा नवा वाद उफाळून आलाय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूरचं पालकमंत्रिपद  मिळावं यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आग्रही होते. तर मंत्री  हसन मुश्रीफ यांनीही कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी जोर लावला होता. दोन नेत्यांमधील संघर्ष टाळण्यासठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची  जबाबदारी देण्यात आली. मात्र खुद्द थोरातांनीचं कोल्हापूरचं पालकमंत्रीपद घेण्यास नकार दिल्यामुळं मतभेद वाढलेत. महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात हे सुरुवातीपासूनचं पालकमंत्रिपदासाठी उत्सुक नव्हते. आपल्याऐवजी विश्वजीत कदम यांना  एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं यासाठी ते प्रयत्नशील होते.  मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. शिवसेनेने मुंबई आणि कोकणाच  बहुतेक ठिकाणी स्वतःचे पालकमंत्री नियुक्त केलेत. मात्र,  पश्चिम महाराष्ट्रातील  पालकमंत्री पदावरून काँग्रेस -राष्ट्रवादीत सुप्त  संघर्ष पेटला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर कोणता तोडगा काढतात हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.
First published:

पुढील बातम्या