Home /News /mumbai /

मुंबईत राजकीय वातावरण बदलणार? भाजपच्या 'मुंबई मिशन'विरोधात आदित्य ठाकरेंचा मेगा प्लॅन

मुंबईत राजकीय वातावरण बदलणार? भाजपच्या 'मुंबई मिशन'विरोधात आदित्य ठाकरेंचा मेगा प्लॅन

 'ज्या काही महापालिकेच्या निवडणुका आहे. कोरोना काळामुळे त्या पुढे ढकल्या होत्या. त्या लवकरच जाहीर होतील.

'ज्या काही महापालिकेच्या निवडणुका आहे. कोरोना काळामुळे त्या पुढे ढकल्या होत्या. त्या लवकरच जाहीर होतील.

'ज्या काही महापालिकेच्या निवडणुका आहे. कोरोना काळामुळे त्या पुढे ढकल्या होत्या. त्या लवकरच जाहीर होतील.

    मुंबई, 25 डिसेंबर : मुंबई महापालिकेची ( Mumbai Municipal Corporation elections) निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी एकत्र लढावे, अशी इच्छाच शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी बोलून दाखवली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठे वक्तव्य केले आहे. 'ज्या काही महापालिकेच्या निवडणुका आहे. कोरोना काळामुळे त्या पुढे ढकल्या होत्या. त्या लवकरच जाहीर होतील. माझा मानस आहे की सर्वांनी एकत्र लढावं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहोत, ते करत राहो' असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच, 'मागील दोन वर्षांपासून आम्ही काम करत आहोत. विकास कामं कुठेही थांबली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आम्ही सगळे पक्ष म्हणून एकत्र काम करत आहोत' असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. हेही वाचा - दोन वर्षांपर्यंत तुमचा कॉल आणि ब्राउजिंग हिस्ट्री स्टोर करणार टेलिकॉम कंपन्या विशेष म्हणजे, एकीकडे मुंबई महापालिकेच्या निमित्ताने भाजपने मिशन मुंबई हाती घेतले आहे. शिवसेनेच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना विशेष जबाबदारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे भाजपला मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या