मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या पार्टीसाठी महाविकास आघाडी सरकारचं 1000 कोटींचं वसुली करण्याचं टार्गेट" आमदार अमित साटम यांचा गंभीर आरोप

"ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या पार्टीसाठी महाविकास आघाडी सरकारचं 1000 कोटींचं वसुली करण्याचं टार्गेट" आमदार अमित साटम यांचा गंभीर आरोप

serious allegaion on Mahavikas Aaghadi by BJP: भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना महाविकास आघाडी सरकावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

serious allegaion on Mahavikas Aaghadi by BJP: भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना महाविकास आघाडी सरकावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

serious allegaion on Mahavikas Aaghadi by BJP: भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना महाविकास आघाडी सरकावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

तुषार रुपनवर, प्रतिनिधी

मुंबई, 20 डिसेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी लेटरबॉम्ब टाकत 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. याच प्रकरणात राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम (BJP MLA Amit Satam) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aaghadi Government) एक गंभीर आरोप केला आहे.

1000 कोटींची वसुली करणार

मुंबईतील एका कार्यक्रमात भाजप आमदार अमित साटम यांनी म्हटलं, आता ख्रिसमस आहे आणि त्यानंतर नवीन वर्ष आहे. या काळात 1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं षडयंत्र महाविकास आघाडी सरकार करणार आहे. कशाप्रकारे करणार?... तर क्लब, रेस्टॉरंट, बार, लग्नसोहळे आहेत आणि आता तर त्यांनी सांगितलंच आहे की घरातही येणार... तुम्ही इमारतीच्या टेरेसवर पार्टी केली तरी तेथे बीएमसी येणार... पोलीस येणार.

मुंबई मनपा आयुक्तांवर गंभीर आरोप

उत्पादन शुल्क विभाग,पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका या सर्वांना 1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं आहे. हे वसुलीचं काम महाविकास आघाडीचा सर्वात मोठा एजंट असलेले मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे.

वाचा : "पंकजाताई माझी औकात काढताना 2019 चा पराभव विसरलात का?" धनंजय मुंडेंचा घणाघात

थर्टी फर्स्टसाठी मुंबई मनपाची नियमावली

कोविड - 19 विषाणूचा ओमायक्रॉन हा नवीन प्रकार जगभरात वेगाने फैलावत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करित असतानाही त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळते आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी जनतेला केले आहे.

नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येणार आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर पथक

लग्न व इतर समारंभांमध्ये उपस्थितीची मर्यादा काटेकोरपणे पाळावी

बंदिस्त जागेत क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थिती

खुल्या जागेत क्षमतेच्या 25 टक्केच उपस्थितीला परवानगी, मात्र 1 हजारांपेक्षा अधिक उपस्थिती नियोजित असेल तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक

हॉटेल्स, उपहारगृह, सिनेमागृह, मॉल्स आदी ठिकाणी नियमांचे योग्य पालन करावे

नाताळ, नववर्ष स्वागताचे समारंभ आयोजन टाळावे

मास्कचा वापर करावा, कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे

First published:

Tags: BJP, BMC, महाराष्ट्र