मुंबई, 27 : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाची पुढील वाटचाल काय असेल ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिंदे गटाला भारतीय जनता पक्षाचा (BJP) पाठिंबा असल्याचं मानलं जात आहे. हा गट भविष्यात भाजपामध्ये विलिन होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deeapk Kesrkar) यांनी यावर उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले केसरकर?
'भाजपामध्ये शिंदेगट विलिन करण्याचा प्रश्न नाही. पक्ष आणि संसदीय पक्ष यामध्ये फरक आहे संसदीय पक्ष हा शिंदे गटाचाच आहे, त्यामुळे कुणामधयेही विलिन होण्याच प्रश्न नाही. उरलेले आमदार आमच्यासोबत आले नाहीत तर ते अपात्र होतील. राष्ट्रवादीनं आमचा पक्ष चार वेळा फोडला आहे. ते आमचा पक्ष कसा वाढवणार? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ही सर्व वक्तव्य आली आहेत. तोपर्यंत उद्धव ठाकरे राजीनामा देण्यास तयार होते. त्यांचा राजीनामा कुणीच मागितला नव्हता. आम्ही उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला नाही. तो आम्ही का मागू? तुम्ही सत्तेमध्ये आमच्यामुळे आहात तर तुम्हाला शिवसेना उद्धवस्त करण्याचा अधिकार कुणी दिला? शिवसैनिकांमध्ये गैरसमज केला जातोय यामधून त्यांनी बाहेर यावं' असं आवाहन केसरकर यांनी केलं आहे.
शिंदे गटाला दिलासा
सर्वोच्च न्यायलयात आज (सोमवार) सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांना दिलासा देण्यात आला आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी ज्या 16 आमदारांना नोटीस पाठवली आहे, त्या नोटीसला आमदारांनी उत्तर द्यायला 11 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांना दिलेल्या नोटीसला उत्तर द्यायला मुदतवाढ देण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून वकिलांनी या कालावधीमध्ये जर सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला तर काय? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी कोर्टाने अजून अशी परिस्थितीच उद्भवलेली नाही. याबाबत आम्ही आदेश देऊ शकत नाही, कारण आणखी गोंधळ निर्माण होईल, पण असं काही झालं तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात येता येईल, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
महाराष्ट्रातील मोठी बातमी : अजित पवार क्वारंटाईन
त्याचबरोबर, नोटीस पाठवलेल्या 16 नाही तर 39 आमदार आणि त्यांच्या कुटुंबाना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्याची आहे, असं कोर्टानं यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.