'या' घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने केली स्वत:ची द्रौपदीशी तुलना

'या' घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने केली स्वत:ची द्रौपदीशी तुलना

...जर द्रौपदी शेवटची महिला झाली, असती तर बरं झालं असतं", "गुंडांचा सामना करण्यापेक्षा गोळ्यांचा सामना करणं सोपं आहे" अशी व्यथा मांडली आहे पालघरच्या जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी.

  • Share this:

28 एप्रिल : "...जर द्रौपदी शेवटची महिला झाली, असती तर बरं झालं असतं", "गुंडांचा सामना करण्यापेक्षा गोळ्यांचा सामना करणं सोपं आहे" अशी व्यथा मांडली आहे पालघरच्या जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी. विवेक पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी निधी चौधरी यांना घेराव घातला. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही झाली. याबद्दल  एका महिला अधिकाऱ्यांना आजही द्रौपदीसारख्या घटना घडत आहेत. जर द्रौपदी शेवटची महिला झाली, असती तर बरं झालं असतं असंही त्यांनी आपल्या ट्विटरवर लिहून आपली व्यथा मांडली.

पालघरच्या मुख्याधिकारी निधी चौधरी यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडल्यानं वाद निर्माण झालाय. 24 एप्रिलला श्रमजिवी संघटनेनं पालघरमध्ये चौधरींना घेराव घातला. यावेळी कार्यकर्ते आपल्याशी अतिशय असभ्यपणे वागले, धक्काबुक्की केली असा आरोप चौधरी यांनी केलाय. घटनेनंतर अतिशय उद्विग्नपणे ट्विट करत त्यांनी महिला अधिकाऱ्यांशी जे वर्तन झालं त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय.

 काय केलं ट्विट ?

"भर सभेत वस्त्रहरण होणारी द्रौपदी ही शेवटची महिला ठरली असती तर बरं झालं असतं. पण महाभारतातल्या अशा घटना भारतीय महिलांच्याबाबतील रोज होतात. गुंडांचा सामना करण्यापेक्षा गोळ्यांचा सामना करण सोपं आहे. आज व्यवस्थेत गुंड हेच देव झालेत."

कोण आहेत निधी चौधरी?

2012 च्या आयएएस अधिकारी

ठाण्यात कारकिर्दीला सुरुवात

रायगडमध्ये उप जिल्हाधिकारी

सध्या पालघरच्या जि.प. सीईओ

First Published: Apr 28, 2017 08:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading