मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Winter Session: "सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर बिनशर्त माफी मागतो" भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी

Winter Session: "सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर बिनशर्त माफी मागतो" भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी

'त्या' घटनेनंतर भास्कर जाधवांनी सभागृहाची मागितली माफी, म्हटलं...

'त्या' घटनेनंतर भास्कर जाधवांनी सभागृहाची मागितली माफी, म्हटलं...

Maharashtra Assembly Session: राज्य विधिमंडलाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

    मुंबई, 22 डिसेंबर : विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नक्कल केल्याने विरोधक आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत भास्कर जाधवांनी माफी मागण्याची मागणी केली. तसेच भास्कर जाधव यांना निलंबित करण्याचीही मागणी केली. विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले. यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर भास्कर जाधव यांनी सभागृहाची माफी मागितली. भास्कर जाधवांनी बिनशर्त मागितली माफी भास्कर जाधव म्हणाले, "मी बोलत असताना कळत नकळत हातवारे होतात. मी बोलण्याच्या ओघात पंतप्रधानांच्या विषयी काही अंगविक्षेप केले असतील किंवा नक्कल केली असेल असं फडणनीसांचं म्हणणं आहे. त्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला नाहीये की, भास्कर जाधवांनी कुठलाही आक्षेपार्ह शब्द वापरला. मी असंवेदनशील शब्द वापरला नाही. मी अंगविक्षेप मागे घेतो म्हटलं पण देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. या सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी मी याठिकाणी पंतप्रधानांच्या बाबतीत काही बोलल्याने सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर केवळ दिलगिरी नाही, मी असंवेदनशील शब्द वापरला नाही जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते तो मी उल्लेख केला तरी देखील मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो." वाचा : सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन नेमकं काय झालं सभागृहात? एका लक्षवेधी दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15-15 लाख रुपये देण्याचं आश्वासन करुन देण्याची आठवण करुन दिली. यानंतर वादाला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. नरेंद्र मोदी यांनी 50 -50 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देईल असं म्हणाले पण काय झालं? असं म्हणत भास्कर जाधव यांनी पंतप्रधनांची नक्कल केली. यानंतर भाजपने आक्रमक होत भास्कर जाधव यांच्या विरोधात घोषणा दिल्या. भास्कर जाधावांनी माफी मागावी अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. तसेच भास्कर जाधव यांना निलंबित करा अशीही मागणी करण्यात आली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे सभागृहात नाहीत त्यांच्याविषयी आपल्याला बोलता येत नाही, कारण ते उत्तर द्यायला नसतात. मी चॅलेंज देतो की असं वक्तव्य माननीय पंतप्रधान यांनी केलंच नाही. देशाच्या पंतप्रधानांबद्दल असं म्हटलं जातंय हे आम्ही सहन करणार नाही. भास्कर जाधव यांना निलंबित करा पंतप्रधान यांची नक्कल कसे करू शकतात. वाचा : "....तर उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात" : चंद्रकांत पाटील अंगविक्षेप करून नक्कल करण शोभनीय नाही. तुमच्या नेत्यांचा अवमान आम्ही करायचा का ? अंगविक्षेप केला तर माफी मागा नाहीतर त्या सदस्याला निलंबित करा अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी म्हटलं, 15-15 लाख रुपये देणार असं पंतप्रधान कधी बोलले नाही असं विरोधक बोलतातय. ते शब्द फिरवतायत. ते पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले. तसंच मी म्हणतोय, की ते पंतप्रधान झाल्यावर मी बोललो नाही तर पंतप्रधान होण्यापूर्वी काय बोलले हे बोललो याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही तर एका उमेदवारीची नक्कल केली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Bhaskar jadhav, Maharashtra, Narendra modi, Winter session

    पुढील बातम्या