BREAKING : हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे संकट, 17 जणांना कोरोनाची लागण

BREAKING : हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे संकट, 17 जणांना कोरोनाची लागण

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील कर्मचारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधींची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे दोन दिवस मुंबईत हिवाळी अधिवेशन ( winter session 2020) भरवण्यात आले आहे. परंतु,

अधिवेशनापूर्व कोरोना चाचणीत (Corona Test) 17 जण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील कर्मचारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधींची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. एकूण 2500 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या 17 रुग्णांमध्ये पोलीस आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. सुदैवाने अधिकारी, विधानभवन कर्मचारी यांचा समावेश नाही. तसंच  कोरोना चाचणी केलेल्या लोकप्रतिनिधींना  कोरोनाची लक्षण नसल्याचे समोर आले आहे.  मागील पावसाळी अधिवेशनात 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

मित्राला दिल्या सुखी संसाराच्या शुभेच्छा,ट्रकच्या धडकेत 4 मित्र जागीच ठार

दरम्यान, राज्य विधिमंडळाचं 2 दिवसांचं अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. असं असलं तरीही या दोन दिवसातही राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. याची चुणूकच कालच्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये पाहायला मिळाली. राज्य सरकार गेल्या वर्षभरात कसं अपयशी ठरलं आहे याचा पाढाच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर पलटवार केला.

वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज, किती वाजता आणि कुठे पाहता येणार जाणून घ्या

त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले पाहायला मिळतील. आजच्या कामकाजात दोन्ही सभागृहांमध्ये संविधानाच्या उद्दिशिकेचं वाचन केलं जाणार आहे. तसंच नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि सहकार विभागाचे अध्यादेश पटलावर ठेवले जातील. वर्ष 2020-2021 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. लोकलेखा समितीचा अहवाल पटलावर ठेवणं आणि काही शोक प्रस्ताव मांडल्यानंतर सभागृहाचं कामकाज समाप्त होणार आहे. या अधिवेशनात 6 अध्यादेश आणि 10 विधेयकं मांडण्यात येणार आहेत.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2020, 9:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या