मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'राज्यपालांना सांगा आमदारांची यादी मंजूर करा', मुनगंटीवार-परब यांच्यात खडाजंगी

'राज्यपालांना सांगा आमदारांची यादी मंजूर करा', मुनगंटीवार-परब यांच्यात खडाजंगी

 राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ( maharashtra winter assembly session 2020) वादळी सुरूवात झाली आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ( maharashtra winter assembly session 2020) वादळी सुरूवात झाली आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ( maharashtra winter assembly session 2020) वादळी सुरूवात झाली आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

    मुंबई, 14 डिसेंबर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ( maharashtra winter assembly session 2020) वादळी सुरूवात झाली आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकशाहीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केला. तर लोकशाहीवर बोलण्याआधी राज्यपालांना 12 आमदारांची यादी राज्यपालांना मंजूर करायला सांगा, असा पलटवार परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी केला. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या तयार करण्यात येतात. मात्र, या समित्यावर समिती प्रमुखाची आणि सदस्यांची नियुक्ती केली. पण त्याची यादीही देण्यात आली नाही. याबाबतच्या बैठक घेतल्या पाहिजे, पण असं होत नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीला बेशुद्ध करण्याचे काम सुरू आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मुनगंटीवार यांच्या आरोपाला उत्तर देत शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी आम्ही बैठकीचे आयोजन करतो. तुम्ही राज्यपालांना 12 आमदारांच्या यादीचा निर्णय घेण्यास सांगा, असं म्हणत सणसणीत टोला लगावला. सभागृहातच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. अखेर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहाबाहेरचा असल्याचं सांगून वादावर पडदा टाकला. दरम्यान, अधिवेशन सुरू होताच विरोधक आक्रमक झाले. राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत बडनेराचे आमदार रवी राणा हे  बॅनर असलेला कुर्ता परिधान करून आले होते. त्यामुळे विधानसभा अध्यशांनी रवी राणा यांना समज दिली. पण देवेंद्र फडणवीस राणांच्या बचावासाठी धावून आले. त्यानंतर अध्यादेश आणि विधेयकं मांडण्यात आली. यामध्ये शक्ती विधेयकाचाही समावेश होता. यावर सविस्तर चर्चा उद्या होणार आहे. तर अधिवेशनाच्या बाहेर  भाजप आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर वेश परिधान करून सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यांच्याकडे असलेलं ढोलही पोलिसांनी काढून घेतला. सरकारला जागं करण्यासाठी मी ढोल वाजवत होतो, पण हे सरकार धनगरांच्या विरोधात आहे असा आरोप पडळकरांनी केला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार रवी राणा शेतक-यांच्या अत्याचारांचं फलक घालून वेलमध्ये आले. यावरून मग काही काळ विधानसभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सत्ताधारी आमदारही वेलमध्ये आले. अशा प्रकारे कोणी सभागृहात येत असेल तर त्यांना प्रवेश देऊ नये, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी मार्शलना दिले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या