मुंबई, 15 डिसेंबर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (maharashtra winter assembly session 2020) दुसऱ्या दिवसालाही वादळी सुरुवात झाली आहे. हक्कभंग सादर करण्यावरून भाजपने जोरदार आक्षेप घेतला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणी चॅनलवरुन काही बोलत असेल तर तो राज्याचा अपमान आहे' अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप नेत्यांना बजावले.
अभिनेती कंगना रनौत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधातील हक्कभंगासंदर्भात असलेल्या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर खऱ्या नावांची का होतेय लपवाछपवी? अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड
त्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंगावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. 'कोणता विषय हक्कभंग समितीकडे देण्यात यावा याचे नियम स्पष्ट आहे. विधिमंडळाचं काम निभावण्यात काही अडथळा आला त्यावेळेस हक्कभंग मांडता येतो. भाजप नेत्यांबद्दल युट्यूबवर वाटेल ते बोलले जाते. जर विरोधी पक्षाबद्दल युट्यूबवर बोलणं झालं तर तोही मग हक्कभंग आहे का ?
तुम्ही भावनेनं विचार करणार नाही नियमाने कराल अशी आमची अपेक्षा आहे. कारवाई करायची असेल तर कायद्याने करा, अशी मागणीच मुनगंटीवार यांनी केली.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. कोणत्याही चॅनलवरून किंवा बाहेर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चुकीचे बोलणे जात असेल तर तो राज्याचा अपमान आहे. हा अपमान तुमचा आणि आमचा सुद्धा आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याबद्दल असं कुणी बोललं तर तो सुद्धा राज्याचा अपमान होता. कुणी जर राज्याच्या राजधानीची तुलना पाकव्याप्त भागाशी करत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्ही याच्या विरोधात एकत्र आले पाहिजे', अशा शब्दांत नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांची कानउघडणी केली.
तसंच, 'माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे काही निर्णय वाचले आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात हिंदु पेपरने काही बातमी केली होती. त्यावर तुम्ही हक्कभंगाची नोटीस काढली होती. तसंच सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्लाही दिला होता', असंही नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
आधी आईला वाचवले नंतर धावती लोकल पकडून मुलीला आणले, महिला पोलिसाचा VIDEO व्हायरल
तसंच, 'अवमान याचिका कोर्टामध्ये याचिका दाखल करायची असेल तर आमदारांना विशेष अधिकार दिला कशाला? जर कोर्टात याचिका दाखल करायची असेल तर मागील वर्षामध्ये भाजप सरकारने किती हक्कभंग काढले आहे, हे वाचून दाखवू का' असं म्हणत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी फटकारून काढले.
तसंच, 'विधिमंडळामध्ये कामकाजाचे काही नियम आहेत. एकदा निर्णय अध्यक्षांचा झाला की, तो विषय पुन्हा आणता येणार नाही. जर असं होत असेल तर अध्यक्षांच्या भूमिकेला आव्हान देणार आहे', असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.