मुंबई, 15 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या (maharashtra winter assembly session 2020) दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. 'ओबीसी आरक्षणात (OBC reservation) जर कुणी वाटेकरी केला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला.
अधिवेशनात पुरवणी मागण्यावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
'सरकारमधील मंत्री हे मोर्चे कसे काढू शकता. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीच मोर्चे काढत आहे. मुळात मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांना तसे करायचं असेल तर राजीनामे द्यावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
VIDEO विधान परिषदेत काँग्रेसचा तुफान राडा; उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचलं
'सरकारने निसंदिग्धपणे सांगावं की ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी नाही. कायद्यात ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे. जर कुणी ओबीसी आरक्षणात वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू' असा इशाराच फडणवीस यांनी दिला.
'धनगर समाजाला आरक्षण देण्यााचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही. आम्ही केसला वेळ लागेल म्हणून आदिवासी समाजाला ज्या सवलती दिल्या त्या धनगर समाजाला दिल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारने आता सर्व सवलती बंद केल्या आहे' असा आरोपही फडणवीस यांनी केला.
VIDEO: पुण्यात वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा! बर्थडे बॉयवरच अंड्यांचा वर्षाव
'राज्य सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने एक पुस्तक लिहिलं. सरकारचं पुस्तक मी वाचलं आहे. महाराष्ट्र थांबणार नाही, असं नाव दिले आहे ते चांगलं आहे. पण, घोषणा थांबणार नाही आणि अंमलबजावणी होणार नाही. वीज बिलाचं काय झाले, मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे, त्याचा कुठेही उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांनी वीज बिलांवर मौन सोडलंच नाही. निदान तुम्ही जे आश्वासन दिलं होतं, ते तर पूर्ण करा, असा टोलाच फडणवीस यांनी सरकारला लगावला.