मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra Weather Forecast: ऐन उन्हाळ्यात बरसणार जोरदार सरी; हवामान खात्याकडून 'या' 10 जिल्ह्यांना इशारा

Maharashtra Weather Forecast: ऐन उन्हाळ्यात बरसणार जोरदार सरी; हवामान खात्याकडून 'या' 10 जिल्ह्यांना इशारा

Maharashtra weather updates: कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. त्याच दरम्यान आता हवामान खात्याने राज्यातील 10 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे.

    मुंबई, 4 एप्रिल : मार्च महिन्यापासून राज्यातील विविध भागांत उष्णतेची लाट (Heat wave) पहायला मिळाली. तापमानाचा पारा हा सातत्याने वाढताना दिसत असून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक भागांत तापामानाने उच्चांक गाठला (temperature rise in Maharashtra). वाढत्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवस अवकाळी पाऊस (IMD predicts unseasonal rain) पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. इतकेच नाही तर राज्यातील 10 जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या 10 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट 5 एप्रिल - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. वाचा : सांताक्रूझमधील पोद्दार शाळेची बस अखेर सापडली, सर्व विद्यार्थी सुखरूप पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 5 एप्रिल कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भ - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 6 एप्रिल कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भ - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 7 एप्रिल कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भ - हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra News, Rain, Weather forecast

    पुढील बातम्या