मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Rain Alert: आजची रात्र मुसळधार पावसाची; मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार पाऊस

Rain Alert: आजची रात्र मुसळधार पावसाची; मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यांत जोरदार बरसणार पाऊस

Maharashtra rain forecast updates: मुंबई आणि ठाण्यात आज रात्रीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra rain forecast updates: मुंबई आणि ठाण्यात आज रात्रीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra rain forecast updates: मुंबई आणि ठाण्यात आज रात्रीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, 10 जून: मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस (Heavy rainfall) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी संपूर्ण दिवसभर मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर आज सकाळपासून रात्रीपर्यंतही पाऊस सुरूच (Rain may continue in Mumbai Thane) होता. आता या पावसाचा जोर रात्री सुद्धा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (thunderstorm with lightning and rain likely to occur in marathwada next 3 hrs) त्यामुळे मुंबई, ठाणे, मराठवाड्यातील नागरिकांनी काळजी घ्या.

हवामान खात्याचे हवामानतज्ज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करुन आगामी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. होसळीकर यांनी म्हटलं, गेल्या 12 तासांत म्हणजेच रात्री 9.30 वाजेपर्यंत मुंबई आणि ठाण्याच्या आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता नवीन सॅटेलाईट इमेजवरून असे दिसते की, पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या ढगांमुळे पावसाचा जोर रात्री सुद्धा कायम राहू शकतो.

मुसळधार पावसात दहिसरमध्ये 3 घरे कोसळली, एकाचा मृत्यू

मराठवाड्यात पुढील तीन तास पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील तीन तासांत जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद येथील विविध भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

11 जून

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी घाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

12 जून

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार वृष्टी तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी घाटात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Rain