मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Alert: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे; कोकणाला ऑरेंज तर पुण्यात यलो अलर्ट

Weather Alert: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे; कोकणाला ऑरेंज तर पुण्यात यलो अलर्ट

Maharashtra weather forecast: पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 8 जुलै : गेल्या सात-आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार (Heavy rain) बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. तर काल रात्रीपासून मुंबईसह (Mumbai) कोकणात (Konkan) पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. पुढील चार दिवसांत दक्षिण कोकणात (South Konkan) जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात पुढील तीन तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग हा 30-40 किमी प्रति तास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी तसेच मोठ्या झाडांखाली आसरा घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणाला ऑरेंज तर पुण्याला यलो अलर्ट

हवामान खात्याने 8 ते 12 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यभरात पाऊस बरसणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार 10 जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 12 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट

''कुछ तो होनेवाला है''; असा मॅसेज फिरतोय, एकनाथ खडसेंनी ईडी कार्यालयात जाताना केला मोठा खुलासा

10 जुलै 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट

रायगड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, विदर्भातील काही जिल्हे आणि पुण्याला यलो अलर्ट

11 जुलै

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट

रायगड, पुणे, सातारा, ठाण्याला यलो अलर्ट

12 जुलै

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट

पुढील हवामानाचा अंदाज

कोकण

8 जुलै - तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

9 जुलै - तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

10 जुलै - तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

11 जुलै - तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्र

8 जुलै - तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

9 जुलै - तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

10 जुलै - घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

11 जुलै - घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा

8 जुलै - तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

9 जुलै - तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

10 जुलै - तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

First published:

Tags: Pune, Rain, Weather warnings