मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra Weather Forecast: राज्यातील काही भागांत पुन्हा उष्णतेची लाट तर 10 जिल्ह्यांत बरसणार जोरदार पाऊस

Maharashtra Weather Forecast: राज्यातील काही भागांत पुन्हा उष्णतेची लाट तर 10 जिल्ह्यांत बरसणार जोरदार पाऊस

Maharashtra Weather updates: महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असतानाच आता काही भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच आता हवामान विभागाने 10 जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra Weather updates: महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असतानाच आता काही भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच आता हवामान विभागाने 10 जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra Weather updates: महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असतानाच आता काही भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. त्यातच आता हवामान विभागाने 10 जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 20 एप्रिल : मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला आणि यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उष्णतेचा हा वाढता पार अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊसही (unseasonal Rain) पडत आहे. कधी कडाक्याचं उन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान आता हवामान विभागाने पुढील 3 दिवस काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट (Heat wave) तर 10 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (IMD predicts unseasonal rain) पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 21 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. 21 एप्रिल ते 23 एप्रिल या काळात काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. या 10 जिल्ह्यांत बसरणार पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड वाचा : कोरोनाने वाढवलं टेन्शन; केंद्राचं 5 राज्यांना पत्र, राज्यात पुन्हा मास्कसक्ती? तर विदर्भातील काही जिल्ह्यांत पुन्हा उष्णतेची लाट पहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक पहायला मिळत आहे. अहमदनगर 42.1, जळगाव 43.1, मालेगाव 43.0, सोलापूर 42.0, औरंगाबाद 40.7, परभणी 42.4, नांदेड 41.6, बीड 42.0, अकोला 44.2, अमरावती 42.08, बुलढाणा 41.03, ब्रम्हपुरी 44.2, चंद्रपूर 44.2, गोंदिया 42.0, नागपूर 43.6, वाशिम 42.5, वर्धा 43.8. पुढील हवामानाचा अंदाज 21 एप्रिल कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 22 एप्रिल कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 23 एप्रिल - कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
First published:

Tags: Maharashtra News, Rain, Weather forecast

पुढील बातम्या