मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra Weather Forecast: उद्या 'या' 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता तर 3 जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Maharashtra Weather Forecast: उद्या 'या' 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता तर 3 जिल्ह्यांत उष्णतेची लाट

राज्यातील 9 जिल्ह्यांना अलर्ट,  'या' 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार तर 3 जिल्ह्यांत उष्णतेची लाट

राज्यातील 9 जिल्ह्यांना अलर्ट, 'या' 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार तर 3 जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Maharashtra weather updates: मार्च महिन्यात संपूर्ण राज्यात तापमानाने उच्चांक गाठला. एप्रिल महिन्यातही तशीच परिस्थिती असताना काही भागांत अवकाळी पाऊस पडत आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 5 एप्रिल : राज्यात तापमानाने उच्चांक गाठला असून उष्णाघातामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याच दरम्यान राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस (IMD predicts unseasonal rain) पडत आहे. उद्या सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस (heavy rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. तीन जिल्ह्यांत उष्णतेची लाट हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच 7 एप्रिल रोजी सुद्धा बुलढाणा, अकोला आणि अमरावतीत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा : 15 दिवसांत 9.20 रुपयांनी महागलं पेट्रोल! सरकारला विचारल्यावर दिलं 'हे' उत्तर पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 6 एप्रिल कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - हवामान कोरडे राहण्याची शक्यता विदर्भ - विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज 6 एप्रिल - आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. 7 एप्रिल - आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. 8 एप्रिल - आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. 9 एप्रिल - आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता. 10 एप्रिल - आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता.
First published:

Tags: Maharashtra News, Rain, Weather forecast

पुढील बातम्या