मुंबई, 5 ऑक्टोबर : पुण्यात काल रात्री मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Pune) बरसला. त्यानंतर आता पुढील चार दिवस सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (IMD predicts heavy rain in next 4 days) आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झालेले असताना आता पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
5 ऑक्टोबर
कोकण - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
6 ऑक्टोबर
कोकण - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
7 ऑक्टोबर
कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळख ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
Pune rain : पुण्यात तुफान पाऊस, पालिकेनं जारी केला हेल्पलाईन नंबर!
8 ऑक्टोबर
कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळख ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकामी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज
5 ऑक्टोबर : आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).
6 ऑक्टोबर : आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).
7 ऑक्टोबर : आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).
8 ऑक्टोबर : आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी, संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IMD FORECAST, Pune, Rain, महाराष्ट्र