Home /News /mumbai /

Weather Alert: घरीच राहा; कोरोनाबरोबरच आणखी एक इशारा

Weather Alert: घरीच राहा; कोरोनाबरोबरच आणखी एक इशारा

Maharashtra Weather updates: राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

    मुंबई, 10 एप्रिल: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (unseasonal rain) हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान (crop damage due to unseasonal rain) झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज आयएमडी मुंबई (IMD Mumbai)ने दिला आहे. आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील वातावरणात फरक जाणवत आहे. वाऱ्याचा द्रोणी भाग असल्याने हा बदल जाणवत आहे. यामुळेच येत्या 4 ते 5 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 11 एप्रिल - कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. Weather Alert! पुढील 3 तासात पुण्यात धडकणार अवकाळी पाऊस; मराठवाड्यासह विदर्भालाही सतर्कतेचा इशारा 12 एप्रिल - कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 13 एप्रिल - कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 14 एप्रिल - कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra, Rain, Weather forecast

    पुढील बातम्या