Home /News /mumbai /

Breaking News : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला, मुंबईच्या आमदाराला संधी

Breaking News : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला, मुंबईच्या आमदाराला संधी

विधानसभा अध्यक्षपदासाठी (Vidhansabha Speaker) सत्तारूढ भाजपा-एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे.

    मुंबई, 1 जुलै : विधानसभा अध्यक्षपदासाठी (Vidhansabha Speaker) सत्तारूढ भाजपा-एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे. मुंबईतील कुलाबाचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. रविवारी ही निवडणूक होणार आहे. सुमारे 170 आमदारांचा पाठिंबा नार्वेकरांना असेल असे मानले जात आहे. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी (Floor Test) एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होईल. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारनं बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे. या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल. सत्तास्थापनेनंतर भाजपाचा जल्लोष, देवेंद्र फडणवीसांच्या अनुपस्थितीची सर्वाधिक चर्चा विधानसभा अध्यक्षपदाला असलेले घटनात्मक अधिकार लक्षात घेता शिंदे सरकारकडून त्यासाठी कुणाची निवड केली जाते याची सर्वांना उत्सुकता होती.हे. या पदासाठी भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत होते. पण, भाजपानं ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    पुढील बातम्या