मुंबई, 08 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची (maharashta corona case) लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local starting from 15th August) सुद्धा 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. पण, मॉल, रेस्टॉरंट आणि मंदिरं (Temples) अद्यापही बंद आहे. सोमवारी टास्कफोर्सची बैठक होणार आहे, या बैठकीत चर्चा केल्यानंतर मंदिर उघडण्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
'आपण आणि आपल्या कार्यालयांच्या वेळा विभागून घ्या. एकाच वेळी गर्दी करू नका. ज्यांना वर्कफॉर्म शक्य आहे, त्यांना वर्कफॉर्म करू द्यावा. आम्हाला सुद्धा कल्पना आहे की प्रत्येक वेळी सर्वांना बंधनात ठेवता येणार नाही. सणासुदीचे दिवस आहे. गर्दी करू नका. हॉटेल, रेस्टारंट, मॉल, मंदिर याबद्दल या निर्णय उद्या होणाऱ्या टासफोर्सच्या बैठकीत घेतला जाईल. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
Mumbai Local : 15 ऑगस्टपासून मुंबईची लोकल सुरू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय यंत्रणा एकच काम करत आहे. त्यामुळे ही यंत्रणा थकली आहे, असं नाही. पण प्रशासकीय यंत्रणा एकच काम करत आहे. दुकानं खुली ठेवावी अशी मागणी होत आहे. मी तर म्हणतो २४ तास दुकानं उघडी ठेवूया, पण कामाच्या वेळेत बदल करावा लागणार आहे. जिथे गर्दी वाढली तिथे रुग्ण वाढले आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिर खुली करण्यासाठी ८ दिवस लागणार आहे. कोरोना गेला आहे, तर दुकानं उघडा अशी मागणी करत आहे. आता लोकांचा संयम सुटत चालला आहे. पण, संयम ठेवावा लागणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
'हे उघडा ते उघडा काही जण म्हणत आहे. महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकावतं आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनं अशा उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये, महाराष्ट्र मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे. हे कौतुक आमचं नाहीतर जनतेचं आहे. मी, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून सर्व्हेतून समोर आलं. पण, हे तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे झाले आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
'नियम पाळावेच लागणार'
जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, तिथे नियम हे पाळावेच लागणार आहे. पुण्यात दररोज ९०० रुग्ण वाढत आहे. सोलापुरात ६०० रुग्ण वाढत आहे, कोल्हापुरात दररोज ५०० रुग्ण संख्या वाढत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, त्यामुळे या जिल्ह्यांची काळजी घेण्याची गरज आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.