मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Local updates: राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवणार; लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होणार?

Mumbai Local updates: राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवणार; लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होणार?

Maharashtra Opening Up: महाराष्ट्रात आता ओपनिंग अपच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई, 13 जुलै: कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 7 जलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर 9 जुलै रोजी राज्य आपतकालिन विभागातील अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली होती. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल मागितला होता. त्या अहवालानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील निर्बंध टप्याटप्याने कमी करून राज्य "ओपनिंग अप" (Opening up) कडे नेण्याचा निर्णय घेत आहेत.

लोकल ट्रेनबाबत काय निर्णय होणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यांपासून निर्बंधात असलेलं महाराष्ट्र राज्य टप्प्याटप्याने अनलॉक होणार असल्याचं बोललं जात आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Unlock करण्यासाठी राज्य सरकारचा 'ओपनिंग अप' मंत्र, पाहा कोणते निर्बंध हटवणार

रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य नागरिकांकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, राज्य सरकार सावध भूमिका घेत तुर्तास तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे.

पुढील आठवड्यापासून निर्बंध हटवले जाण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टप्याटप्याने सर्व आस्थापना सुरू करण्याचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. दुकानांच्या वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असून दुकानांमधील सर्व कर्मचा-याचे लसीकरण झालेले आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यामध्ये रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाणार असून, 50 टक्केची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचा-यांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंट प्रवेशात प्राधान्य देण्यासंदर्भातील विचार सुरू आहे. शक्य असेल तिथं बंदिस्तऐवजी मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था हॉटेलना करण्याच्या सूचना दिल्या जातील.

First published:

Tags: Mumbai, Mumbai local