• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Maharashtra unlock : लोकलचे दार बंदच! राज्य सरकारकडून रेड सिग्नल हटेना

Maharashtra unlock : लोकलचे दार बंदच! राज्य सरकारकडून रेड सिग्नल हटेना

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा (mumbai local) सुरू करावी, अशी आग्रहाची मागणी होत आहे. पण नवी नियमावली जाहीर झाली असून लोकल सुरू करण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.

 • Share this:
  मुंबई, 02 ॲागस्ट : राज्यात कोरोनाची (maharashtra corona cases) लाट आता आटोक्यात आली आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा (mumbai local) सुरू करावी, अशी आग्रहाची मागणी होत आहे. पण नवी नियमावली जाहीर झाली असून लोकल सुरू करण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे लाखो चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. राज्य सरकारकडून ११ जिल्हे वगळता अनलॅाकचे नियम शिथिल Restrictions relaxed) करण्यात आले आहे.. या संदर्भात नवी नियमावली (New guidelines) जाहीर केली आहे. पण मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लोकल सुरू करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कोर्टात टोलवण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबद्दल वेगळी घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने विचार सुरू आहे. ज्यांना लसींचे दोन डोस दिले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्यायची का? पण हे करायचं झालं तर तितकी तपासणी यंत्रणा आहे का? रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करुन मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल. त्यामुळे आता राज्य सरकार लोकल ट्रेन संदर्भात काय निर्णय घेतं हे पहावं लागेल. अशी आहे नवीन नियमावली ११ जिल्हात कोरोनाबाधित रुग्ण संख्या चिंताजनक असल्यामुळे मुभा देण्यात आली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पालघर,सोलापूर, रत्नागिरी, बीड, रायगड जिल्हात आधीची नियामावली लागू करण्यात आली आहे. सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील. सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत. सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने  सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सुचना जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सुचना. सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही. राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील. शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल. सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही. गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत   मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.
  Published by:sachin Salve
  First published: