• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Maharashtra unlock : दुकानांच्या वेळेत वाढ, मुख्यमंत्र्यांकडून कोरोना निर्बंध आणखी शिथील!

Maharashtra unlock : दुकानांच्या वेळेत वाढ, मुख्यमंत्र्यांकडून कोरोना निर्बंध आणखी शिथील!

राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युझमेंट पार्कमधील...

राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युझमेंट पार्कमधील...

राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युझमेंट पार्कमधील...

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाची लाट (corona) ओसरल्यामुळे आणखी निर्बंध शिथील (Maharashtra unlock  ) करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे.  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी घोषणा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thckery) यांनी केली आहे. तसंच, अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबरपासून सुरू होण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होतांना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले' जन्म आणि मृत्यू एकत्रचं! 25 व्या मजल्यावरुन पडून दोन जुळ्या भावांचा दुर्देवी अंत 'मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसंच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे. लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मी आमदार आहे..', भर बैठकीत रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी, VIDEO 'कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  Published by:sachin Salve
  First published: