• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Maharashtra Covid Guidelines: राज्यातील हॉटेल्स रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, वाचा काय आहेत Guidelines

Maharashtra Covid Guidelines: राज्यातील हॉटेल्स रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, वाचा काय आहेत Guidelines

Maharashtra restaurants shops open till late hours: राज्यातील दुकाने, हॉटेल्स उशीरा पर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • Share this:
मुंबई, 19 ऑक्टोबर : राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू सर्व निर्बंध शिथिल (Restriction relaxed) करण्यात येत आहेत.  कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू होत आहेत. तर उपाहारगृहे आणि दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत होती, ही मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच इतर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. यासोबतच त्यासंदर्भातील कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना जाही करण्यात आल्या आहेत. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. सोमवारी वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील. या संदर्भात आता मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी इतर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दुकान, रेस्टॉरंटमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले आवश्यक आहे फेस मास्क अनिवार्य आहे सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे 'मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसंच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल झालेल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या आहेत. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे. लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालच्या बैठकीत म्हणाले. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषदांच्या बाबतीतही त्यांची परिणाणकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी आणि संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. '...तर दिवाळीनंतर 2 डोसची अट शिथिल करणार' राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आणि लसीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याने राज्य सरकारने मंदिरे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लोकलमध्ये (Mumbai Local Train) केवळ दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच परवानगी आहे. पण आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी एक मोठी दिलासादायक माहिती दिली आहे. एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन, मॉल्समध्ये प्रवेश मिळण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. दसरा झाला आणि आता दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोकं गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहे देखील उघडणार...या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांची संख्या वाढतेय का आणि त्याचे प्रमाण कसे आहे याचा अभ्यास करून कोविड निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होऊ शकतो. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून दिवाळीनंतर कोरोना केसेस कमी राहिल्या तर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्कफोर्सच्या सल्ल्यानुसार उघडलेल्या सर्व क्षेत्रातील उपक्रमामध्ये सहभागी होता येईल, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यात दिली आहे.
Published by:Sunil Desale
First published: