• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईतल्या अनलॉकवर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

मुंबईतल्या अनलॉकवर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

Mumbai Unlock: सरकारच्या नव्या नियमावलीनुसार (New Guidelines) मुंबई नेमकी (Mumbai) कोणत्या टप्प्यात (Level)येते या बद्दल संभ्रम होता. मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा संभ्रम दूर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 05 जून: येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra Unlock) अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार (New Guidelines) मुंबई नेमकी (Mumbai) कोणत्या टप्प्यात (Level) येते या बद्दल संभ्रम होता. मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा संभ्रम दूर केला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या अनलॉकबाबत भाष्य केलं आहे. राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार मुंबई तिसऱ्या गटात येत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य शासनाच्या निकषानुसार आणि नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं आहे. यामुळं मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत असल्याचं महापौरांनी सांगितलं. मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुपटीचं प्रमाण 515 दिवसांवर पोहोचलं असल्यानं सध्याच्या परिस्थितीत दोन आठवड्यांची आकडेवारी पाहिल्यावर मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई ही तिसऱ्या स्तरापर्यंत असल्याचं त्या म्हणाल्या. हेही वाचा- लग्न करणाऱ्यांना आता 'नो टेन्शन', राज्य सरकारकडून नियमात बदल पुढे त्यांनी सांगितलं की, येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबईत तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काही दिवसात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आली तर त्यानुसार नियम लागू केले जातील. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO Maharashtra) संध्याकाळी पुन्हा आकडेवारी जाहीर करण्यात येईल. नियम (Rules) नक्की काय आणि कसे ते सांगण्यात येईल. त्यानंतर तपशीलवार नियमावली (Detailed Notification) मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली आहे. हेही वाचा- 'या' जिल्ह्यात सोमवारपासून अंत्यविधीसाठी कोणतीही बंधनं नाही, वाचा सविस्तर मुंबईतील बेड 35 टक्के भरलेले आहे. ग्लोबल टेंडर अपात्र ठरलयं. अपेक्षित होतं की लस बनवणाऱ्या कंपन्या टेंडर भरतील. मात्र पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी टेंडर भरले. डॉ रेड्डीज कंपनीशी बातचीत सुरू आहे. जी बातचीत सकारात्मक सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
  Published by:Pooja Vichare
  First published: