• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Maharashtra Unlock: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत आज महत्त्वाची बैठक; निर्बंध शिथिल होणार? लोकल संदर्भात काय निर्णय होणार? 

Maharashtra Unlock: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत आज महत्त्वाची बैठक; निर्बंध शिथिल होणार? लोकल संदर्भात काय निर्णय होणार? 

Maharashtra restrictions likely to be relaxed: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना आता पूर्णपणे अनलॉक करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक सुद्धा होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 जुलै : राज्यात कोरोनाची (Corona) असलेली दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही जळवपास आटोक्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील निर्बंध हटवण्याची आणि मुंबईतील लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सर्वांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात मागणी जोर धरत आहे. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील का? या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे आरोग्य विभाग (Health Department) आणि टास्क फोर्सच्या (Task Force) अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या राज्यांत कोविड रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे त्या ठिकाणी संपूर्ण अनलॉक करण्याच्या संदर्भात निर्णय होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकल ट्रेन संदर्भात काय निर्णय? मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून आणि प्रवासी संघटनांकडून सुरू आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांतील रुग्णसंख्याही आटोक्यात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मोठी बातमी, 25 जिल्हे होणार अनलॉक, मुंबईची लोकल होणार सुरू? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याच दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोकाही वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविल्यास तिसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविण्या ऐवजी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती राज्यात काल (28 जुलै 2021) रोजी 6105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53 टक्के इतके झाले आहे. तर 6857 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येचा आकडा कमी होत असल्याने दिलासा मिळत असताना कोरोना बाधित मृतकांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. राज्यात 28 जुलै 2021 रोजी 286 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: