Home /News /mumbai /

Maharashtra Unlock Breaking : ठाणे संपूर्ण अनलॉक; मात्र लोकलमधून करू शकणार का प्रवास?

Maharashtra Unlock Breaking : ठाणे संपूर्ण अनलॉक; मात्र लोकलमधून करू शकणार का प्रवास?

Mission Begin Again या अंतर्गत उद्यापासून 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे.

    मुंबई, 3 जून : राज्यात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असल्याचं वृत्त मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 5 टक्के पाॅझिटीवेहीटी रेट आणि ऑक्सिजन 25 टक्के बेड आहेत, तेथे लाॅकडाऊन राहणार नाही. याठिकाणी माॅल्स, हाॅटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही असेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रम लग्न सोहळा यास मंजूरी देण्यात आली असून 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. दुसरीकडे पहिल्या पातळीत येणाऱ्या जिल्ह्यात खासगी व सरकारी कार्यालयांना 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे ही वाचा-Maharashtra UNLOCK BREAKING: राज्यात अनलॉकच्या 5 लेवल्स जाहीर दुसरीकडे मुंबईचा पॉझिटिव्ही रेट जास्ट असल्याने काही निर्बंध तसेच ठेवण्यात आले आहेत. ठाण्यात मात्र पूर्ण अनलॉक करण्यात आलं असून कार्यालये, सर्व दुकाने, मॉल्स सुरू होणार आहे. मुंबईत लोकल सुरू नसल्याने येथेही सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही. मात्र पुढील आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर लोकल सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Level 1 - औरंगाबाद, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नांदेड, नासिक, परभणी, ठाणे, वर्धा पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेनं व्यवहार सुरु राहतील असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्या थिएटर्स, कार्यालयं, शूटिंग, जिम, सलून सुरु राहतील. त्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमास 50 टक्के परवानगी असेल. लग्न सोहळ्यास हॉलना 50 टक्के आणि जास्तीत जास्त 100 लोकांना उपस्थिती राहण्याची मुभा असेल. अंत्यविधी सोहळ्यास सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Central railway, Corona, Mumbai local

    पुढील बातम्या